दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक

 गेवराई येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे | शिक्षक धोंडराई कॅम्प येथून सकाळी १० च्या सुमारास गेवराईकडे येथे | येत असताना उमापूर-धोंडराई रोडवरील रामनगर तांडा येथे समोरून येणाऱ्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन यात एका | शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गेवराई येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक संजय मारोती गीते हे धोंडराई कॅम्प येथून आज सकाळी १० च्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून गेवराई कडे येत असताना समोरून मोटारसायकलवरून रितेश हाराळे (वय २०) रा.राजपिंपरी हा आपल्या मोटारसायकलवरून गेवराई कडून उमापूरकडे भरधाव वेगात जात असताना दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने न्यायालयात यात संजय मारोती गीते यांचा जागीच मृत्यू झाला. तर रितेश हाराळे हा युवक गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. अमरावतीत दिवसा ढवळ्या एकाची धारदार शस्त्राने हत्या