जनदत टिम वासिंद : आज आपल्या आजूबाजूला करोना विषाणूचे संकट पसरले आहे, व त्या संबंधी आवश्यक ती काळजी राज्य सरकार व केंद्र सरकार घेत आहेच व त्यामुळे विविध व्यवस्थापनांना सुट्टी दिली आहे. परंतु दावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे महत्व जाणून नाईलाजास्तव सदर परीक्षा चालूच ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. त्यामुळे कलम १४४ व जमावबंदी लागू असतांना देखील सदर विद्यार्थी आयुष्यातील महत्वाची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येत आहेत. करोना विषाणू ह्म मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत आजार असल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत त्यात मास्कचा वापर सुचविण्यात आलेला आहे. शालांत परीक्षेस येणारे अनेक विद्यार्थ्यांकडे असे मास्क किंवा पर्यायी सुविधा उपलब्ध नाहीत व त्यामुळे या एकत्र येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव ठेवन वासिंद मधील MS-CIT (MKCL) च्या अधिकृत केंद्रांनी एकत्र येऊन सदर विद्यार्थ्यांना मोफत फेस मास्क व करोना विषाणू सबंधी काळजी घेण्याचे इतर पर्याय असलेले पत्रक विद्यार्थ्यांना (जेणेकरू त्याबाबत जागरूकता निर्माण होईल) वाटण्याचा उपक्रम सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वासिंद येथे केला. ज्यामुळे सदर परीक्षा केंद्रात येण्याऱ्या विद्यार्थ्यांना सदर विषाणंचा संसर्ग होऊ नये व त्यांना आवश्यक ती सुरक्षा प्रदान करता येईल. सदर उपक्रमाची सुरुवात मा. भेरे साहेब (चेअरमन), यांच्या शुभहस्ते करण्यात आली, यावेळी मा. सरेश रोटे (सेक्रेटरी), मा. अनिल देशपांडे, मा. खंड कंटे, मा. अनंता भोईर, सदस्य, विद्या विकास मंडळ, वासिंद हे उपस्थित होते. सदर उपक्रमास सरस्वती विद्यालयातील प्राचार्य अमृतकर सर, उपप्राचार्य व्ही.टी.भोईर सर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः उपस्थित राहून स्व :हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यास सदर फेस मास्क मिळेल याची काळजी घेतली व छान सहकार्य केले. सदर उपक्रम वासिंद मधील MS-CIT (MCKL) चे अधिकृत केंद्राद्वारे एक सामाजिक जाणीव व बांधिलकी जाणून राबविण्यात आला, यात विनायक पवार/ सौ.मधुशा विनायक पवार (कमलीट कॉम्पुटर एज्यूकेशन), नरेश पाटील (करीयर कॉम्पुटर इन्स्टिट्यूट), मंगेश काठोळे (काठोळे इन्फोटेक), प्रभाकर शिंदे (युनिव्हर्सल आय.टी.), विलास जाधव (सिस्टेक कॉम्पुटर एज्यूकेशन) व सर्व केंद्राचे कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सुमारे १२०० फेसमास्कचे वाटप विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालक यांना करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले व सदर उपक्रम शाळेत राबवून सामाजिक बांधिलकीचे भान राखल्याबद्दल सर्व MSCIT (MKCL) अधिकृत केंद्र चालकांचे आभार मानले.
शालांत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत फेस मास्क व माहिती पत्रक वाटप