कोरोनाच्या एका रुग्णाने संपूर्ण देशाला भरली धडकी

कोरोनाच्या एका रुग्णाने संपूर्ण देशाला भरली धडकी


__ रियाध दि. ८ (वृत्तसंस्था) - कोरोनामुळे संपूर्ण जगात थैमान घातले आहे. प्रत्येक क्षणाला मृतांच्या आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या १४ लाख ३० हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार हून अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जग जणू लॉकडाउन झालं आहे. पण एक असा देश ज्याने एका कोरोना रुग्णाच्या भीतीने संपूर्ण शहराला कारंटाइन केले आहे. ते शहर आह सादा अराबया, सौदी अरेबियामध्ये २७९५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ४१ जणांचा मृत्यू झाला आहे, या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच त्यांनी संपूर्ण शहराला लाकडाउन कल हात, मात्र लोकानी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, पारणामा काराना देशभर पसरला, त्यामुळे जवळजवळ ३ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाने सर्व जनतेला वारंटाइन केले आहे. केवळ वैद्यकिय कर्मचारी आणि पोलीसांना मुभा देण्यात आली आहे. सौदीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाची स्थिती पाहता, येत्या काळात २ लाख लोकांना कोरोना होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं लोकांना नियमाचे पालन करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. सौदी अबियाने आपली सर्व प्रवासी उडाणे रद्द केली आहेत. देशातील सर्व व्यवसाय उपक्रम बंद आहेत. सर्व प्रमुख शहरांमध्ये कर्ण लाग करण्यात आला आहे. देशाची राजधानी असलेल्या प्रियाघमध्येही लाकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री तौफिक अल- रबिया यांनी या परिस्थितीबाबत सांगताना, 'आज आपण निर्णायक वळणावर उभे आहोत, समाज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. हा विषाणू टाळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जनतेला केले. ४ महिने तरी द्यावा लागेल लढा तौफिक यांनी लोकांना सूचना दिली की, आताही लोकांना हा आजार समजत नाही. सौदी माजी मोही अरेबियामधील केवळ ५० टक्के लोक सरकारच्या आवाहानाला गांभीर्याने घेत आहेत. वेळीच सर्वसाधारण सभा घेणे थांबवा, रस्त्यावर जाणे थांबविणे आवश्यक आहे. सौदी अरेबियाच्या आताच्या परिस्थितीनसार सरकारला कोरोना विषाणशी लहायला आणि पराभत करण्यास समारे ४ महिने ते एक वर्षाचा कालावधी लाग शकेल. असा इशाराही तौफिक यांनी दिला आहे.