___ मुंबई दि. ८ (वृत्तसंस्थाजसलोक हॉस्पिटलमधील २१ कर्मचारी कोरोना बाधित

___ मुंबई दि. ८ (वृत्तसंस्था) - मबईतील सुप्रसिद्ध अशा जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल २१ कर्मचा-यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्यामुळे १३ एप्रिलपर्यंत ज स लोक हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. याआधी मुंबईतीलच व्होकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने हे रुग्णालय कन्टेंटन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना ही लागण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे, ही लागण सुरुवातीला एका नर्सला झाल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हॉस्पिटलने त्यांच्या १००५ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी के ली, ज्यात २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांवर सध्या जसलोक, कस्तुरबा आणि सेव्हन हिल्समध्ये उपचार सुरु आहेत, जस लोक प्रशासनाने या घटनेनंतर खबरदारी म्हणून १३ एप्रिलपर्यंत हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त इमर्जन्सी आणि कोविड-१९ हेच वॉर्ड सुरु राहणार असल्याची माहिती जस लोक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरयान यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यात मुंबईतील व्होकहार्ट रुग्णालयात एका आठवड्यातच २६ नर्स तीन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबई महापालिकेने हे हॉस्पिटल सील केले. सगळ्यांच्या कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळणार नाही किंवा कोणी हॉस्पिटलमधून बाहेर येणार नाही, दरम्यान, रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करताना सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई अनिवार्य करावे, असे जाणकारांचे मत आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने व्होकहार्ट आणि जसलोक हॉस्पिटल दक्षिण मुंबईतील ही दोन प्रमुख रुग्णालये आता कन्टेंटन्मेंट झोन घोषित झाली आहे.