म्हणून विलगीकरण कक्षात दाखल सातारा दि. ८ - जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असलेल्या ८ ते ७० वर्ष वयोगटातील ११ पुरुष व ४ महिला अशा १५ नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे कोरोना बाधित निकट सहवासित असणाऱ्या १ ते ८० वर्ष वयोगटातील ३१ पुरुष व १७ महिला असे एकूण ४८ नागरिकांना व १ ते २३ वर्ष वयोगटाती ३ महिलांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व ६६ अनुमानितांच्या घशातील स्त्रावाचे नमूने बी.जे, महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, आमोद गडीकर यांनी कळविले आहे. उच्च न्यायालयात याचिका
सातारा येथे १५ तर कराड येथे ५१ अनमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल